ऍग्रोवीर: आपल्या शेतीला द्या नवे जीवनदान
ऍग्रोवीर: शेतीची वीरता वाढवणारे उद्पादन
ऍग्रोवीर: शेतकऱ्यांचे शेतीवरील योग्य समाधान
ऍग्रोवीर: आपल्या शेतीतील फळ झाडांना द्या योग्य पोषण
शेती हे आपल्या देशातील शेतकऱ्यांचा पोटापाण्याचा आधार आहे. मात्र वातावरणामध्ये होत असलेले बदल शेतकऱ्यांच्या शेतीला पार पोखरून टाकत असतात. फळ आणि झाड यांचे रक्षण करणे सध्या शेतकऱ्याला फारच कठीण होऊन बसले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांवर दिवसेंदिवस रोग पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भाज्यांची वाढ न होणे, केळ्यांवर करपा हा रोग पडणे, कांदा सडून जाणे, डाळ आणि कडधान्याला कीड लागणे, उसातील साखरेचे कमी प्रमाण या समस्यांमुळे शेतकरी खूप त्रस्त झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. अश्या कमी प्रतीच्या उद्पादनाला आणि पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे आपला पोशिंदा शेतकरी हा दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दाबला जात आहे.
शेतकऱ्यांचे वरील सगळे प्रश्न सोडवण्यासाठी यावर उपाय म्हणून ऍग्रोवीर यांनी एक नवीन उद्पादन तयार केले आहे. विविध फळ आणि झाडं यांची चांगली वाढ व्हावी आणि त्यांना चांगले पोषण मिळावे यासाठी सेतू या शेतकरी उद्पादक कंपनीने ऍग्रोवीर बूस्टर तयार केले आहेत. या उद्पादनाने झाडांची आणि फळांची वाढ पाहिजे तशी होते. फळांचा रंग आणि त्यांची वाढ चांगली होण्यासाठी हे बूस्टर वापरता येईल. ऍग्रोवीर बूस्टर यामुळे केळ्याच्या झाडावर करपा रोग पडणार नाही, कडधान्य आणि डाळी यांमधील पोषकता वाढवण्यास मदत मिळेल, उसातील साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत मिळेल, भाज्यांची वाढ आणि हिरवेगारपणा जश्याचा तसा राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना फळ आणि उद्पादनावर हमीभाव देखील चांगला मिळेल. यामुळे शेतकऱ्यांची शेती समृद्ध होण्यास मदत मिळेल.
याव्यतिरिक्त शेतीत केमिकलयुक्त रसायनांचा वापर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या शेतकऱ्यांसाठी मोठ्या समस्या आहेत. मात्र ऍग्रोवीर केमिकलयुक्त रसायनांचा प्रभाव आणि त्यांच्यातील जीवनसत्व जीवाष्मच्या माध्यमातून झाडांपर्यंत पोहोचविण्याचे काम करते. ऍग्रोवीरच्या बूस्टरमुळे जमिनीत जीवाष्म यांची वाढ होते आणि ते जीवाष्म झाडांना संपूर्ण भागात पोषक तत्व पोहोचविण्याचे कार्य करतात. यामुळे मातीची, झाडांची आणि फळांची गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळते. ऍग्रोवीर हे मातीचे पोषण वाढविण्यास मदत करते ज्याचा उपयोग इतर खतांच्या परिणामांमध्ये देखील होतो. ॲग्रोवीर हे असे उत्पादन आहे कि ज्यामध्ये प्राथमिक पोषक, दुय्यम पोषक, सूक्ष्म पोषक, हार्मोन्स वाढ आणि बॅक्टेरिया असतात जे आपल्या पिकांना वाढीस पोषक ठरतात.
ऍग्रोवीर बूस्टर हे फळांचे रंगद्रव्य सुधारते त्यामुळे फळांचा आकार वाढतो, अपरिपक्व फुलांचे जतन करते, झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि मुळांच्या विकासास मदत करते. मातीतून सूक्ष्म पोषक तत्वांचे शोषण सुधारते त्यामुळे रासायनिक खतांचा वापर ३०% नी कमी करतो. सगळे ऍग्रोवीर बूस्टर हे एक बहु-पीक ICAR मान्यताप्राप्त आहे जे जवळपास 100% सेंद्रिय आहे.
शेतकऱ्यांचे वीर म्हणता येईल असे हे उद्पादन आहे. शेतातील पाट्याच्या पाण्यात बूस्टर थेंब टाकून झाडांपर्यंत पोहोचविले जातात तसेच झाडांवरील पानांवर याची फवारणी केली जाते यामुळे तुमच्या शेतातील पोषक तत्व आणि झाडांचा ताजेपणा टिकण्यास मदत होईल. ऍग्रोवीर हे शेतकऱ्यांसाठी ढालीचे काम करेल. शेतकऱ्यांसाठी ऍग्रोवीरचे बूस्टर हे वरदानच ठरेल. एग्रोवीर ऑल फ्रूट्स बूस्टर, एग्रोवीर नर्सरी बूस्टर, एग्रोवीर ऊस बूस्टर, एग्रोवीर केळे बूस्टर, एग्रोवीर कांदा विशेष बूस्टर, एग्रोवीर धान्य आणि डाळी बूस्टर असे विविध बूस्टर एग्रोवीरकडून तयार करण्यात आलेले आहेत जे तुमच्या शेतीला भविष्यात योग्य पर्याय ठरेल.